spot_img
spot_img
spot_img

एमएनजीएल अधिकाऱ्याचे सोंग घेऊन ज्येष्ठ नागरिकाला 11.39 लाखांचा गंडा

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी युनूस खतीब

एमएनजीएल गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचे भासवून सायबर भामट्यांनी एका नागरिकाची तब्बल 11 लाख 39 हजार 997 रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार चिंचवड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला व्हॉट्सअॅप कॉल करून स्वतःला एमएनजीएलचा अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर एक लिंक पाठवून मोबाईल हॅक केला. ओटीपी आणि क्रेडिट कार्डची माहिती मिळवत आरोपींनी फिर्यादीच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्यांमधून आणि क्रेडिट कार्डमधून 11.39 लाख रुपये परस्पर काढून घेतले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित व्यक्तीने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 319(2), 318(4) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66(C), 66(D) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सायबर गुन्हेगारांकडून बँक, गॅस कंपनी किंवा सरकारी संस्थेचे नाव वापरून नागरिकांना जाळ्यात ओढले जात असल्याने कोणतीही संशयास्पद लिंक उघडू नये व ओटीपी किंवा बँकिंग माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!