spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडमध्ये महिला मोर्चातर्फे उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये महिला मोर्चातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाता पलांडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये महिलांनी सामूहिक योगाभ्यास करत निरोगी जीवनाचा संदेश दिला. यावेळी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, तणावमुक्त आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी योगाची आवश्यकता, तसेच नियमित योगाभ्यासामुळे होणारे शारीरिक आणि मानसिक फायदे याविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

विशेषतः महिलांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्यासाठी योग अत्यंत उपयुक्त असल्याचे अधोरेखित करण्यात आले. “निरोगी महिला, सशक्त कुटुंब आणि सक्षम समाज” हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि भंडाराधिकारी यांनी परिश्रम घेतले. महिला मोर्चाच्या सरचिटणीस दीपाली कलापुरे, मंडलाध्यक्षा स्वाती जाधव आणि किरण पाचपांडे यांनी नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीने कार्यक्रमाची अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून पार पडले असून, भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून निरोगी समाज घडविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!