शबनम न्यूज | प्रतिनिधी
चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजच्या राष्ट्रीय सेवा योजना व प्रतिभा ज्युनियर कॉलेजच्या सखी सावित्री समितीचे वतीने पिंपरी पोलीस ठाणे मधील दामिनी पथकाच्या ललिता फडतरे व ज्योती चापुडे यांनी विद्यार्थ्याना महिला सुरक्षा , आपत्कालीन महिला हेल्पलाईन , सायबर सुरक्षितता , आणि स्वसंरक्षणाचे मूलभुत धडे शिकविले .व तुमची सुरक्षा तुमच्या हातात आहे . धाबरू नका . प्रसंगी आवाज उठवा , दामिनी पथक तूमच्या साठीच आहे असा विश्वास त्यानी विद्यार्थीनीना दिला .
तसेच आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम उत्साहात महाविद्यालयाच्या प्रांगणात साजरा झाला. विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी किमया आश्रम चॅरिटेबल ट्रस्टच्या मेजर राजू ढमाले व त्याच्या सहकारीनी उपस्थितांना सूक्ष्म व्यायाम , योगासने , सूर्यनमस्कार , प्राणायमचे प्रात्यक्षिके, व ध्यानाचे प्रशिक्षण देत शारीरिक-मानसिक आरोग्य व दैनंदिन योगाचे महत्व पटवून देण्यात आले. रोज पंधरा मिनिटे योग केल्याने ताण कमी होतो , एकाग्रता वाढते आणि परीक्षा काळात मन शांत राहते असा सल्ला मार्गदर्शन करताना त्यानी दिला . शारीरीक शिक्षण विभाग प्रमुख डॉ . शबाना शेख , राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सुकलाल कुंभार , प्रा सुप्रीया गायकवाड यांनी संयोजन केले . प्रास्ताविक डॉ . शबाना शेख , व प्रा रुची यादव यांनी केले . उपस्थित तज्ञ प्रशिक्षक व आदी मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला . असा दुहेरी कार्यक्रम संपन्न झाला .
कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्थेचे संस्थापक सचिव डॉ . दीपक शहा, खजीनदार डॉ. भूपाली शहा , संचालिका डॉ . तेजल शहा , मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ राजेंद्र कांकरीया, वरीष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी , उपप्राचार्या डॉ . जयश्री मुळे , प्रतिभा ज्यूनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ . वनिता कुऱ्हाडे , विभाग प्रमुख डॉ. श्रुती गणपुले, यांचे मार्गदर्शन लाभले.


