spot_img
spot_img
spot_img

नोकरीच्या आमिषाने होणाऱ्या आर्थिक फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे रोजगाराच्या संधी वाढत असताना काही ठिकाणी बेरोजगार युवक-युवती व शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षण व कायमस्वरूपी नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता काही कंपन्या बंद केल्याच्या घटनाही निदर्शनास आल्या आहेत.

यामुळे नोकरीच्या आमिषाला बळी न पडता सरकारी किंवा खासगी नोकरीसाठी कोणत्याही सल्लागार, एजंट किंवा मध्यस्थांना आर्थिक रक्कम देऊ नये. नोकरी स्वीकारण्यापूर्वी संबंधित कंपनीची सत्यता पडताळून पाहावी. कामगार कायद्यांबाबत काही तक्रारी असल्यास कामगार उप आयुक्त, पुणे जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कामगार उप आयुक्त, पुणे यांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!