spot_img
spot_img
spot_img

देहूफाटा परिसरात अनैतिक व्यवसायाविरोधात कारवाई; महिलेवर गुन्हा

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

आळंदी : सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून वेश्याव्यवसायासाठी ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेविरोधात दिघी पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूफाटा येथील डुडुळगाव रोड परिसरात, आय हॉस्पिटलजवळ संबंधित महिला सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना लैंगिक हावभाव व शब्दांचा वापर करून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करत होती. त्यामुळे सार्वजनिक शिष्टाचार व सभ्यतेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आले.

माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून संबंधित महिलेविरोधात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी महिलेला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!