शबनम न्यूज | प्रतिनिधी
सदाशिव पेठेतील चारुदत्त अपार्टमेंट येथे मंगळवारी मध्यरात्री इमारतीचा काही भाग कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे इमारतीत अडकलेल्या 10 रहिवाशांसह एका कुत्र्याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
माहितीनुसार, 17 मार्च रोजी रात्री सुमारे 11.58 वाजता सीमाभिंत, गॅलरी व जिन्याचा भाग अचानक कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर पाच महिला व पाच पुरुषांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. घटनास्थळी पोलीस, महापालिकेचे अधिकारी आणि वीज वितरण कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.




Total Users : 241256