पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
रमजान ईद निमित्त चिंचवडमधील चाफेकर चौक येथील ईदगाह मैदानावर मोठ्या प्रमाणात नमाज पठणासाठी भाविकांची गर्दी होणार असल्याने २१ मार्च रोजी (चंद्रदर्शनानुसार एक दिवस पुढे-मागे) सकाळी ५ ते दुपारी १ वाजेपर्यंत परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलीस उपायुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी अधिसूचना जारी केली आहे.
या कालावधीत मरीआई माता मंदिर ते चाफेकर चौक, तसेच चाफेकर चौक ते मरीआई माता मंदिर या मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.
तसेच मोरया नगर ते चाफेकर चौक मार्गावरही वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले असून, एसकेएफ कंपनीकडून अहिंसा चौक मार्गे, तसेच सेव्हन ऑरेंज हॉस्पिटलमार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे. चाफेकर चौकाकडून जुना जकात नाका व अहिंसा चौक मार्गेही पर्यायी मार्ग उपलब्ध राहणार आहेत.
अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर सर्व वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्य करून वाहतूक सुरळीत ठेवावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




Total Users : 241256