spot_img
spot_img
spot_img

ताथवडेतील बांधकाम साईटवर कॅम्प बॉसवर फावड्याने हल्ला

कामगारांमधील वादातून मारहाण; तीन आरोपी अटकेत

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब

ताथवडे येथील महिंद्रा हॅप्पीनेस या बांधकाम प्रकल्पाच्या लेबर कॅम्पमध्ये कामगारांमधील वादातून कॅम्प बॉसवर फावड्याने हल्ला केल्याची घटना घडली.

या हल्ल्यात कॅम्प बॉस गंभीर जखमी झाला असून वाकड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास ताथवडे येथील महिंद्रा हॅप्पीनेस प्रकल्पाच्या लेबर कॅम्पमध्ये ही घटना घडली. कॅम्प बॉस म्हणून काम करणारे सुरज सुरेश चव्हाण (वय २८) आणि त्यांचे सहकारी सुजय शिंदे हे बांधकाम साईटवर भांडण करणाऱ्या कामगारांना कॅम्प सोडून जाण्यास सांगण्यासाठी गेले होते.

त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या कामगारांनी संतापून सुरज चव्हाण यांच्यावर फावड्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या नाकाचा उजवा भाग कापला गेला, वरचा ओठ जखमी झाला तसेच जबडा आतून फाटल्याने ते गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी अभिजीत अशोक पिसाळ (वय ३६, रा. आकुर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात दिपक रॉय, अब्दुल कलीम, मोहम्मद सलीम आणि जावेद अहमद (सर्व सध्या रा. महिंद्रा हॅप्पीनेस लेबर कॅम्प, ताथवडे, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यापैकी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!