पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी १८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
चैतन्य विनोद शेंडगे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीने टेलिग्रामवर चॅनेल सुरू करून गणित १ आणि गणित २ चा पेपर असल्याचा दावा करत विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ६०० रुपये क्यूआर कोडद्वारे घेत असल्याचे तपासात उघड झाले.
पैसे घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना ब्लॉक केले जात असल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी टेलिग्रामवरील चॅनेल बंद करून २५५ सदस्यांची माहिती मिळवली आहे.
दरम्यान, बोर्डाने स्पष्ट केले आहे की गणिताचा पेपर लीक झालेला नाही आणि विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.



