पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात बहुळ गावात गावठी दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेले मोठ्या प्रमाणातील रसायन पोलिसांनी जप्त करून नष्ट केले.
या प्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ९ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.५० वाजण्याच्या सुमारास मौजे बहुळ, पठारे वस्ती (ता. खेड, जि. पुणे) येथे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सानिया शुभम राजपूत (रा. बहुळ, ता. खेड, जि. पुणे) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी महिलेने आठ पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये (५००, ३०० व २०० लिटर क्षमतेच्या) एकूण २९०० लिटर गावठी दारू तयार करण्यासाठीचे उग्र वासाचे रसायन भिजत घातले होते. या रसायनाची अंदाजे किंमत १ लाख ४५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी पंचासमक्ष छापा टाकून सदर रसायन आणि प्लास्टिकच्या टाक्या जागीच नष्ट केल्या. परिसरात चौकशी केली असता या टाक्या सानिया शुभम राजपूत हिच्याच मालकीच्या असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३६/२०२६ दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (सी) व (एफ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी फिर्याद पोलीस शिपाई सुधीर शिवाजी दांगट (गुन्हे शाखा युनिट-३, पिंपरी चिंचवड) यांनी दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार वाडेकर करत आहेत.





Total Users : 213657