पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड : ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ३० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार चिखली परिसरात उघडकीस आला आहे.
महिला आरोपीने फिर्यादीला “621 NWMG – Fortune Navigator Club” या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करून ट्रेडिंग अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले व गुंतवणुकीवर जास्त नफा मिळेल असे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादीकडून एकूण ३०,५०,००० रुपये घेतले आणि पैसे परत न देता आर्थिक फसवणूक केली.
याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४२/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ व माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत महिला आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक फडतरे करत आहेत.



