spot_img
spot_img
spot_img

नाणेकरवाडीत २५० ग्रॅम गांज्यासह महिला ताब्यात

प्रतिनिधी | युनूस खतीब

नाणेकरवाडी परिसरात पोलिसांनी कारवाई करत २५० ग्रॅम गांज्यासह एका महिलेला ताब्यात घेतले.

ही कारवाई ८ मार्च रोजी सायंकाळी जंबूकर वस्ती चौकात करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या ताब्यातील निळ्या रंगाच्या कॅरीबॅगमध्ये सुमारे २५० ग्रॅम वजनाचा, अंदाजे १२ हजार ७५० रुपये किमतीचा गांजा आढळून आला. हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या कब्जात ठेवला असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट १९८५ च्या कलम ८(क), २०(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित महिलेला बीएनएसएस ३५(३) अन्वये नोटीस देऊन सोडण्यात आले असून पुढील तपास सपोनि पाटील करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!