शबनम न्यूज | प्रतिनिधी
सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्रास दिल्याप्रकरणी दिघी पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ४ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १.१० वाजण्याच्या सुमारास देहूफाटा – डुडुळगाव रोडवरील बन्सीलाल कापड दुकानाजवळील सार्वजनिक ठिकाणी घडली.
याप्रकरणी सोमनाथ बाळू खळसोडे (पोलीस शिपाई, दिघी पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, लता नवनाथ पाटील (वय ५२, रा. चंदननगर, पुणे) ही महिला सार्वजनिक ठिकाणी उभी राहून जाणाऱ्या व्यक्तींना “चल येतोस, ५०० रुपये दे, चांगली सर्व्हिस देते” असे अश्लील शब्द वापरत हावभाव करत होती. त्यामुळे तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण होऊन सार्वजनिक सभ्यतेचा भंग होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९९/२०२६ दाखलकरण्यात आला असून अनैतिक व्यापार प्रतिबंधक (पिटा) अधिनियम १९५६ चे कलम ८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी महिलेला बीएनएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भिसे करीत आहेत.


