spot_img
spot_img
spot_img

शेअर मार्केटमध्ये जास्त नफ्याचे आमिष; ११ लाखांची फसवणूक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा १० ते २० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिघांकडून ११ लाख रुपये उकळल्याचा प्रकार नवी सांगवी येथे उघडकीस आला आहे.

याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ८ एप्रिल २०२३ पासून ते ४ मार्च २०२६ दरम्यान गणेश पॅलेस, समर्थनगर, सर्वे नं. ७४/१, नवी सांगवी येथे घडली.

याप्रकरणी प्रतीक संजय तोडमल (वय २९, व्यवसाय, रा. फ्लॅट नं. ४, गणेश पॅलेस, समर्थनगर, साई चौक, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, प्रविण विठ्ठल काटकर (वय ३३, नोकरी, रा. फ्लॅट नं. १६, गणेश पॅलेस, समर्थनगर, नवी सांगवी) याने फिर्यादी तसेच दीपक लोंढे व अक्षय सुतार यांना शेअर मार्केटशी संबंधित “पी. के. प्रॉफिट ट्रेडिंग” या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा १० ते २० टक्के नफा मिळवून देतो, तसेच एक वर्षानंतर मूळ रक्कम परत देतो असे आमिष दाखवले.

आरोपीने त्यांच्याकडून लेखी करार करून फिर्यादीकडून २ लाख ५० हजार रुपये, दीपक लोंढे यांच्याकडून ५ लाख रुपये आणि अक्षय सुतार यांच्याकडून २ लाख रुपये अशी एकूण ११ लाख रुपयांची गुंतवणूक करून घेतली. मात्र, नफा किंवा मूळ रक्कम परत न करता आरोपीने त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०९/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२) व ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी अद्याप अटकेत नसून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!