spot_img
spot_img
spot_img

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली ७.१० लाखांची फसवणूक

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी युनूस खतीब

पिंपरी : एमबीबीएस अभ्यासक्रमात मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका डॉक्टरची ७ लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सप्टेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत आरोपीने स्वतःला एन. वाय. तासगावकर कॉलेजचा प्रतिनिधी असल्याचे भासवले. तसेच संबंधित कॉलेजचे बनावट वेबपेज तयार करून फिर्यादी यांच्या मुलीला एमबीबीएस प्रवेश देण्याचे आमिष दाखवले.

विश्वास संपादन करून आरोपीने ऑनलाईन व रोख स्वरूपात ७.१० लाख रुपये घेतले. मात्र प्रवेश न देता पैशांचा अपहार केल्याचे तसेच पैसे परत मागितल्यावर धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणाचा तपास Pimpri Chinchwad Police करीत असून आरोपी अद्याप फरार आहे.

नागरिकांनी शैक्षणिक प्रवेशासंदर्भात फसव्या दलालांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!