पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: युनूस खतीब
पिंपरी : पिंपळे सौदागर येथील क्राऊन बेकरीत केकचे पैसे मागितल्यावर तीन तरुणांनी दहशत माजवत बेकरी कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी अटक करण्यात आला आहे.
दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११.१० वाजता जगताप नगर, काटे डेअरीसमोर असलेल्या क्राऊन बेकरीत नौशाद मुख्तार अहमद (वय ४२) हे काम करत असताना आरोपी आदित्य मानवतकर, अथर्व चव्हाण व यश दुर्गे यांनी केक घेतला व पैसे न देता निघून जाण्याचा प्रयत्न केला.
पैसे मागितल्यावर आरोपी आदित्य मानवतकर याने फिर्यादीच्या शर्टाच्या खिशातील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
यानंतर “आम्ही येथील भाई आहोत” असे म्हणत आरोपींनी आरडाओरड केली. त्यातील एका आरोपीने धारदार कोयता काढून दाखवत फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली व परिसरात दहशत निर्माण करून तिघेही पसार झाले.
या घटनेप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७८/२०२६ नोंदवण्यात आला असून बी.एन.एस., भारतीय शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी क्रमांक १ आदित्य मानवतकर यास अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास सुरू आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.


