शबनम न्यूज | प्रतिनिधी
कोरेगाव भीमा (ता. खेड) परिसरात बांधकामासाठी ठेवलेले साहित्य बेकायदेशीररीत्या चोरून नेल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात सुमारे ६० हजार रुपयांचे लोखंडी पाईप व साहित्य चोरीला गेल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
दि. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास, कोरेगाव भीमा येथील बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या गोदामाच्या जागेवर ही घटना घडली.
फिर्यादी यांनी भाड्याने बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी घेतलेल्या जागेवरून आरोपींनी मालकाची परवानगी किंवा संमती न घेता, संगनमताने लोखंडी पाईप व इतर साहित्य चोरून नेले.
या प्रकरणातील फिर्यादी समर सुधाकर पाचरणे (वय २७, रा. राक्षेवाडी, ता. खेड) यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये बाळू सिताराम लोढे (वय ४५) अशोक लेलँड कंपनीचा ट्रक (क्रमांक MH 14 KQ 0757) वरील चालक आसिफ चौधरी (वय २३) रवींद्र प्रल्हाद कांबळे (वय ४०)
आयाज खान (वय ३०)
यांचा समावेश असून, आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
यातील आरोपी क्रमांक १ व २ अटकेत असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत.




Total Users : 228624