spot_img
spot_img
spot_img

आळंदी परिसरातील हॉटेलमध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; परराज्यीय महिला, हॉटेल चालकासह आठ जण अटकेत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आळंदी–चऱ्होली रोडवरील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराचा मोठा पर्दाफाश दिघी पोलिसांनी केला आहे. या कारवाईत हॉटेल चालक, व्यवस्थापकांसह आठ जणांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणी अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजता साई पॅलेस हॉटेल, देहू फाटा, आळंदी–चऱ्होली रोड, आळंदी देवाची, पुणे येथे करण्यात आली. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६३/२०२६ नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी एकूण १७ पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारात ढकलले होते.

या महिलांना ग्राहक उपलब्ध करून देत, त्यांच्याकडून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका भागवली जात होती.

तसेच देहव्यापार करताना ५१ हजार ७५० रुपयांचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या प्रकरणी हॉटेल चालक पद्मलोचन दास ऊर्फ कालूशेठ, हॉटेल मालक अवधूत गाडे, व्यवस्थापक, एजंट तसेच परराज्यातील आरोपींचा समावेश असून, काही आरोपी पश्चिम बंगाल व नेपाळ येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी क्रमांक १ ते ६ यांना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

या कारवाईत पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यांना संरक्षण व पुनर्वसनासाठी संबंधित संस्थांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!