spot_img
spot_img
spot_img

धारदार हत्यार दाखवून चिकन व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी; थेरगावमध्ये खंडणीचा प्रकार, एक अटकेत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

थेरगाव परिसरात चिकन विक्री व्यवसाय करणाऱ्या तरुणाकडून पैशांची खंडणी उकळण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, धारदार हत्यार दाखवून जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागितल्याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एक आरोपी अटकेत आहे.

ही घटना एप्रिल २०२३ ते जून २०२३ तसेच दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १० वाजता ते दि. ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.१५ वाजेपर्यंत बारामती अॅग्रो चिकन अँड एग्स, शिवशक्ती नगर, पाण्याच्या टाकीजवळ, थेरगाव, पुणे येथे घडली.

प्रतिक संजय लांडगे (वय २९, व्यवसाय – चिकन विक्री, रा. बारणे कॉर्नर, थेरगाव) असे फिर्यादीचे नाव असून, आरोपी विक्की रामप्रसाद मल्ल (वय ४५, रा. कैलास नगर, मोहतादेवी मंदिराजवळ, थेरगाव) याने फिर्यादीकडे “मी या एरियातील भाई आहे, आत्ताच मोक्यातून जामिनावर बाहेर आलो आहे” असे सांगत ५०० रुपयांची खंडणी मागितली.

आरोपीने फिर्यादीकडून ऑनलाईन तसेच रोख स्वरूपात पैसे स्वीकारले. तसेच दि. ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी सुमारे १०.१५ वाजता आरोपीने हातात धारदार हत्यार घेऊन फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली आणि पुन्हा खंडणीची मागणी केली. हत्यार हवेत फिरवून परिसरात दहशत माजवण्यात आली. भीतीपोटी फिर्यादीने ५०० रुपये रोख रक्कम आरोपीला दिली.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलीस अधिनियम व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास काळेवाडी पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!