spot_img
spot_img
spot_img

मोशी येथे पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; निष्काळजी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे–नाशिक महामार्गावर मोशी परिसरात पिकअप वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याची घटना घडली असून, या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात पिकअप चालकाविरुद्ध निष्काळजी वाहनचालना प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता पुणे–नाशिक महामार्गावरील नागेश्वर हायस्कूलजवळ, मोशी, पुणे येथे घडली. याबाबत दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.

चंदन कोमलकांत झा (वय ३८, व्यवसाय – नोकरी, रा. शिवाजीवाडी, मोशी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी आपल्या होंडा एसपी १२५ (क्र. MH 14 LW 4957) या दुचाकीवर मुलगी साक्षी व मुलगा सिद्धार्थ यांच्यासह प्रवास करत असताना, त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या पिकअप (क्र. MH 14 EM 2717) वाहनाने बेदरकारपणे धडक दिली.

अपघातात फिर्यादी रस्त्यावर पडले असून, त्यांच्या पायाच्या घोट्याजवळ व डाव्या पायाच्या गुडघ्याखाली गंभीर दुखापत झाली आहे. तसेच, मुलगा सिद्धार्थ याच्या उजव्या बरगडीला फ्रॅक्चर होऊन त्यास गंभीर इजा झाली आहे. दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या प्रकरणी पिकअप चालक अक्षय मल्लारी भोर (वय ३२, रा. नारायणगाव, पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!