spot_img
spot_img
spot_img

पोलीस भरती प्रक्रियेमुळे भोसरी–इंद्रायणीनगर परिसरात वाहतूक बदल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील रिक्त पदांच्या पोलीस भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर, भोसरी येथे दिनांक ११ ते २६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडणार आहे.

या कालावधीत परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक शाखेकडून तात्पुरते वाहतूक बदल जाहीर करण्यात आले आहेत.

पोलीस उप-आयुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, चिखली वाहतूक विभाग अंतर्गत भोसरी इंद्रायणीनगर येथील महादेव मंदिर ते श्री स्वामी समर्थ सी.बी.एस.ई. स्कूल गेट क्रमांक २ या रस्त्यावरून सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग जाहीर

भोसरी तिरुपती (सहारा) चौकाकडून इंद्रायणीनगर स्वीट कॉर्नर चौकाकडे जाणारी वाहतूक श्री समर्थ सी.बी.एस.ई. स्कूल गेट क्रमांक २ येथून उजवीकडे वळून इंद्रायणीनगर पोलीस वसाहत मिनी मार्केट मार्गे रामकृष्ण मोरे प्रवेशद्वारातून पुढे जाईल.
तर स्वीट कॉर्नर चौकाकडून तिरुपती (सहारा) चौकाकडे जाणारी वाहतूक महादेव मंदिर येथून डावीकडे वळून रामकृष्ण मोरे प्रवेशद्वार, मिनी मार्केट व राकेश स्वीट मार्ट मार्गे इच्छित स्थळी जाईल.

हे वाहतूक बदल दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते २६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.

अत्यावश्यक सेवांतील पोलीस, अग्निशमन दल व रुग्णवाहिका यांना या निर्बंधांतून वगळण्यात आले आहे.

नागरिकांनी नमूद कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!