• मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • आणखी
    • पुणे
    • धार्मिक
    • संपादकीय
Search
Logo
  • Blog
  • About
  • Contact
spot_img
Logo
Logo
spot_img
  • मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • आणखी
    • पुणे
    • धार्मिक
    • संपादकीय
  • मुख्यपृष्ठ
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • आणखी
    • पुणे
    • धार्मिक
    • संपादकीय
spot_img

माणसाला समृद्ध करणार्‍या दिवाळी अंकांची परंपरा जपावी – अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड

Shabnam News
By Shabnam News
July 10, 2025
WhatsApp
Facebook
Copy URL
Telegram
Twitter

    शबनम न्यूज | प्रतिनिधी

    ‘आजच्या पिढीत वाचनसंस्कृती रुजलेली नाही. या पिढीने किती मराठी पुस्तके वाचली आहेत किंवा किती मराठी लेखकांची नावे त्यांना माहीत आहेत याची शंका वाटते. त्यामुळे दिवाळी अंकासारखी ज्ञानगंगा जपणे, आपली अभिरुची संपन्नता जपणे गरजेचे आहे,’ असे मत अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी व्यक्त केले.

    स्वर्गवासी कमलाबाई रसिकलाल धारिवाल पुरस्कृत छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेच्या पुरस्कार वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. भारत सासणे, ज्येष्ठ लेखिका डॉ. सिसिलिया कार्व्हालो, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, स्पर्धेचे परीक्षक माधव राजगुरू, संयोजक दिनकर शिलेदार, प्राजक्ता शिलेदार आदी उपस्थित होते. यावेळी विविध विभागांमध्ये एकूण ४२ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

    निशिगंधा वाड म्हणाल्या, “आईमुळे मीही लिहिते झाले. तिच्या पहिल्या लेखनाचे आम्ही वाचक असायचो. माझे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असले तरी माझी पहिली कविता मराठीत केली होती. दिवाळी अंक माणसाला अधिक समृद्ध करतात.”

    प्रा. जोशी म्हणाले, “दिवाळी अंक ही लेखकांसाठीची प्रयोगशाळा आहे. दिवाळी अंकांनी लेखकांसह संपादकांना आणि चित्रकारांनाही प्रतिष्ठा मिळवून दिली. आज दिवाळी अंकांची संख्या वाढत असली तरी त्यांची गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे.”

    भारत सासणे म्हणाले, “दिवाळी अंकांची ही परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली असून, मराठी व बंगाली भाषेत विशेषांक निघतात. अनेक आव्हानांवर मात करून ही परंपरा जपणाऱ्या संपादकांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम आहे.”

    ‘साहित्याला कुठलाही धर्म नसतो,’ हा मुद्दा अधोरेखित करीत डॉ. कार्व्हालो यांनी, नाताळ तसेच ईदनिमित्त प्रकाशित होणाऱ्या अंकांचाही या पुरस्कारांमध्ये समावेश केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अन्वय बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

    You Tube

    YouTube Video VVV0Ykk4d3A0cm94U1VaQUNfY2xrQ1hRLnU0aUhsNjdTUnk0 #Pune #CrimeNews #BreakingNews
पुण्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. Sonali Hinge उर्फ दामिनी मार्शल आणि रिलस्टार यांच्याविरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका महिला प्राचार्याला पोक्सो कायद्याची धमकी देत लाखोंची खंडणी उकळल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात काही पोलिस कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे.

Pune शहरात घडलेल्या या घटनेमुळे पोलिस दलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    #Pune #CrimeNews #BreakingNews
पुण्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. Sonali Hinge उर्फ दामिनी मार्शल आणि रिलस्टार यांच्याविरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका महिला प्राचार्याला पोक्सो कायद्याची धमकी देत लाखोंची खंडणी उकळल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात काही पोलिस कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे.

Pune शहरात घडलेल्या या घटनेमुळे पोलिस दलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    #sonalihinge दामिनी पथकातील ‘रील स्टार’ सोनाली हिंगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
    पिंपरी-चिंचवड शहरातील मोहन नगर मध्ये गॅस गळती, एक जण जखमी
    #pcmc 

औद्योगिक शहरांमध्ये नोकरीच्या शोधात येणाऱ्या तरुणांची फसवणूक थांबवण्यासाठी भोसरी आणि चाकण येथे ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. हा उपक्रम पिंपरी-चिंचवडचे महापौर Ravi Babasaheb Landge यांच्या पुढाकारातून साकारला आहे.

भोसरी येथील संविधान चौकाजवळील फुगे प्रायमा येथे या केंद्राचे उद्घाटन महापौर लांडगे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शहरातील विविध मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

या केंद्राच्या माध्यमातून आर्थिक अडचणीत असलेल्या तसेच योग्य मार्गदर्शन न मिळालेल्या युवक-युवतींना पूर्णपणे मोफत सेवा दिली जाणार आहे. नोकरीसाठी पैसे घेणाऱ्या एजंटांकडून होणारी फसवणूक रोखणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

महापौर लांडगे यांनी सांगितले की,
“कौशल्य असूनही अनेक तरुण आर्थिक परिस्थितीमुळे मागे पडतात. बाहेरून येणाऱ्या मुलांना राहण्यापासून नोकरीपर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच आम्ही ही सेवा पूर्णपणे ‘विनामूल्य’ सुरू केली आहे.”

या केंद्रात खालील सेवा मोफत दिल्या जाणार आहेत:

नोकरीसाठी नोंदणी
विविध कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी
राहण्याबाबत मार्गदर्शन
करिअर काउंसिलिंग

आतापर्यंत सुमारे २ हजार युवक-युवतींनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.

दहावी, बारावी, ITI, डिप्लोमा, इंजिनिअरिंग तसेच पदवीधर उमेदवारांसाठी हे केंद्र अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. भोसरी आणि चाकण या दोन ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असून, जास्तीत जास्त युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापौर लांडगे यांनी शेवटी सांगितले की,
“तरुणांना केवळ नोकरीच नाही, तर सन्मानाचे आयुष्य देणे हे आमचे कर्तव्य आहे. विकसित महाराष्ट्रासाठी सक्षम युवक घडवणे हीच आमची दिशा आहे.”
    युवकांनो सावधान! फसवणूक टाळा — भोसरी-चाकणमध्ये ‘मोफत रोजगार केंद्र’ सुरू
    बारामती पोटनिवडणुकीतुन लक्ष्मण हाके यांची माघार
    पुणे सासवड मार्गावर बोपदेव घाटात कारचा भीषण अपघात
    सीडीआर प्रकरणी आरोपानंतर अंजली दमानिया यांचे प्रत्युत्तर
    Subscribe

    Related Articles

    आरोग्य व शिक्षण

    दारूच्या नशेत पत्नीवर जीवघेणा हल्ला; तळेगावात पतीविरुद्ध गुन्हा

    क्राईम

    दिघीत वेअरहाऊसमध्ये कोयत्याचा धाक; ‘महिन्याला हप्ता द्या’ म्हणत दहशत, दोघे अटकेत

    क्राईम

    ‘नवीन ऑटो रिक्षा’च्या नावाखाली १.०५ लाखांची फसवणूक; बनावट पावती देत आरोपी फरार

    ताज्या बातम्या

    आरोग्य व शिक्षण

    दारूच्या नशेत पत्नीवर जीवघेणा हल्ला; तळेगावात पतीविरुद्ध गुन्हा

    क्राईम

    दिघीत वेअरहाऊसमध्ये कोयत्याचा धाक; ‘महिन्याला हप्ता द्या’ म्हणत दहशत, दोघे अटकेत

    क्राईम

    ‘नवीन ऑटो रिक्षा’च्या नावाखाली १.०५ लाखांची फसवणूक; बनावट पावती देत आरोपी फरार

    क्राईम

    प्रेमसंबंधात अडथळा ठरल्याने ६ वर्षीय चिमुकल्याचा निर्घृण खून; आईसह प्रियकराचा कट उघड

    क्राईम

    दिघीत सार्वजनिक ठिकाणी अनैतिक कृत्य; पोलिसांकडून कारवाई, महिला आरोपीविरुद्ध गुन्हा

    Load more
    Logo

    Contact us: [email protected]

    या न्युज पोर्टल वरील प्रकाशित झालेल्या बातम्या, लेखाशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही. काही वाद उद्भभवल्यास पुणे न्यायालया अंतर्गत राहील अन्य कुठेही नाही

    Facebook
    Instagram
    Twitter
    WhatsApp
    Youtube

    2025 © Copyright - shabnamnewsonline.in| All rights reserved.

    Website developed by Softisky Media Solution | 9764331134

    error: Content is protected !!