spot_img
spot_img
spot_img

मनुवादी विचारांचे सरकार ओबीसीचा काय विकास करणार? – वडेट्टीवार

जनगणना घोषणा निवडणुकीपुरतीच नसेल ना?
ओबीसी मेळाव्यात वडेट्टीवार यांची सरकारवर टीका

पिंपरी(प्रतिनिधी) केंद्रात जे भाजपचे सरकार बसलेत आहे, ते डॉ बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा गांधींच्या विचारांचे नसून आरएसएस, मनूवादी, गोळवलकर गुरुजींच्या विचारांचे असल्याने ओबीसीं,आदिवासी, मागासवर्गी्यांचा ते कधीच विकास करू शकणार नाही. तुम्हा आम्हाला देशाला केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानच वाचवणार आहे.
आपले नेते राहुल गांधी यांच्या अथक परिश्रमाने, संघर्षामुळे आज केंद्राने जातीनिहाय जनगणनेची घोषणा केली. मात्र मला एक भीती वाटते कि ही घोषणा देखील केवळ बिहारच्या निवडणुका असल्याने जाहीर केली कि काय ?
अशा शब्दात माजी विरोधी पक्षनेते तथा विधी मंडळाचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी शंका व्यक्त केली.
काँग्रेस ओबीसीच्या वतीने पूर्णा नगर चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी सोमनाथ शेळके यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन केले.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, जालन्याचे आमदार राजेश राठोड,अ. भा.ओबीसीचे निरीक्षक राजेंद्र राख, माजी आमदार दीप्ती चवधरी,प्रदेश सरचिटणीस बाबू नायर, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ कैलास कदम, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत नेवाळे ओबीसी सेलचे शहराध्यक्ष सोमनाथ शेळके, डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉ मनीषा गरुड, गौतम आरकडे, ,मनोज कांबळे,उपाध्यक्ष भरत वाल्हेकर, नरेंद्र बनसोडे,छाया शेळके, अमोल कदम,प्रवीण जांभळे, अनिता धर्माधिकारी, राणी कोरडे, जमादार हुसेन,आलम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
सूत्र संचालन राहुल शिंपले यांनी तर आभार मुजावर मोहम्मद यांनी मानले.
श्री. वडेट्टीवार पुढे म्हणाले कि,
जाती-जातीत भांडणं लावून आपली पोळी शेकायची आणि ती नाही जमली तर हिंदू खतरे हैं असं म्हणून जाती जातीत धर्माची दरी निर्माण करायची.हे भाजपचे कारनामे आहेत.देशात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत उच्च पदावर हिंदू बसलेले आहे.हिंदूंची 85% लोकसंख्या आहे तर 15 टक्के मुस्लिमांची संख्या आहे 15 टक्के मुस्लिम हिंदूंना संपवतील का?मात्र ” हिंदू खतरे मे है”अशी भीती दाखवली जाते. कारण ओबीसी,दलित, बहुजन, मागासवर्गीयांनी आपला हक्क मागू नये. आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी भाजप धर्मांधाचा आधार घेत आहे. केलेली कामे सांगू शकत नाही,अशा वेळी लोकांचा बळी घेऊन धर्मांची पोळी शेकून सध्या राजकारण सुरू आहे.जेव्हा जेव्हा समाज आपल्या हक्कासाठी लढाईसाठी तयार होतो तेव्हा तेव्हा भाजपकडून धर्माची भिंत उभी केली जाते. आगामी निवडणुका नसत्या तर छगन भुजबळांचा राज्याभिषेक झाला नसता.

राज्यातील तीन पक्षाचे सरकार टिकेल का?
तिन्ही पक्षाचे नेते एकत्र आल्यावरच गोड गोड वागतात. पाठ फिरवल्यास त्यांची धुसफूस सुरू होते. एकमेकांचे वैरी बनले. केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून छगन भुजबळांचा त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. ओबीसींची मत आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा हेतू आहे. भाजप हा धूर्त आणि बेईमानी पक्ष आहे. तो ठराविक लोकांसाठी काम करतोय.
लाडकी बहीण योजने सारख्या योजना राबवण्यासाठी पैसा लागतो.अभाव असल्याने आदिवासी विभाग सामाजिक न्याय विभागाचा निधी वापरला जातोय. राज्यावर कर्जाचा डोंगर करून काय लडकी बहीण योजना राबवणार.तिन्ही पक्षांनी प्रचंड लूट सुरु केलीय. मुंबईतील मोक्याच्या जागा उद्योगपती अदानीच्या घश्यात घातल्या आहे.

पिंपरी चिंचवडमहानगरपालिके कडे एकेकाळी १७/१८ हजार कोटींचे डिपॉझिट होते मात्र ससे, कोल्हे,लांडगे या जाणवरांनी एकत्र येऊन पालिका ओरबाडून खाल्ली. किमान १० टक्क्याच्या वरच कमिशन आहे. यामुळे प्रचंड भ्रष्टाचार वाढलाय.असा आरोप केला.

 

…तर गवई यांचे नाव सुवर्ण अक्षराने लिहले जाईल

इस्राईल च्या कंपनीने ३३ देशातील ईव्हीएम मशीन हॅक करून निकाल बदलल्याची कबुली दिली.हे जनतेचे सरकार नाही.राज्यात केवळ ५०-५५ जागा येतील असा सर्वांचा अंदाज असताना एकदम इतक्या जागा कशा काय जिंकल्या?
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमताई यांनी देखील बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याची इच्छा व्यक्त केली.ही इच्छा जर
सर्वोच्च पदावर विराजमान गवई साहेबांनी पूर्ण केली तर त्यांचे नाव जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरले जाईल.आणि देशातील निवडणुका पारदर्शी होईल. असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी श्री माळी म्हणाले कि, आमचे नेते राहुल गांधी यांच्या पाठपुराव्या मुळे केंद्र सरकारने ओबीसी जातीनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले मात्र पुढील अंमलबजवणी कधी करणार? रूप रेषा कशी असेल हे अदयाप चित्र स्पष्ट झालेले नाही.
श्री.साठे म्हणाले कि,समाजाने आर एस एस समजून घेतली पाहिजेत.आर एस एस च्या कुशीतून भाजप आली. गोळवलकरांच्या विचारातून मनुवादी समाज रचना आणायची होती. हा डाव हाणून पडला.राहुल गांधी यांची कितीही टिंगल करा पण ते मोदींच्या डोळ्यात डोळे घालून बोलणारा एकमेव नेता आहे.
सौ. चवधरी म्हणाल्या कि, राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर दबाव आणल्याने जातीनुसार जनगणना होणार असल्याचे जाहीर करावे लागले.जातीय जन गणना झाल्यावर ओबीसी समाज हा ५० ते ६० टक्के होईल.
श्री.कदम म्हणाले कि,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कुदळवाडी च्या परिसरात रोहिंगे, दहशदवादी, बांग्ला देशी नागरिक राहतात यांच्या नावाखाली उद्योगावर अमानुष पणे कारवाई केली.मात्र कुदळवाडीत रो्हिंग्या बांगलादेशी एकही सापडला नाही.आम्ही प्रश्न केला असता अद्याप पालिकेकडून उत्तर आले नाही. चिखली तील ३६ बंगले पाडले, मग बांधकाम करण्यास परवानगी दिली कशी? असा प्रश्न उपस्थित केला.
सोमनाथ शेळके म्हणाले कि, हे पुरोगामी विचारांचे शहर आहे. राज्यातील काँग्रेसच्या मान्यवर नेत्यांनी
लक्ष घातल्यास शहरात काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल.ओबीसी चा मेळावा ही एक चांगली सुरुवात अशा शब्दात समाधान व्यक्त केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!