मापसा, गोवा – इंडिया थाई किक बॉक्सिंग फेडरेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पहिली राष्ट्रीय थाई किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप दिनांक 23 ते 25 मे 2025 दरम्यान गोव्यातील मापसा येथे उत्साहात पार पडली. देशभरातील विविध राज्यांतील संघांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
*स्पर्धेचे उद्घाटन मापसा जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती नीता पेडणेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.*
तीन दिवस चाललेल्या या *स्पर्धेत महाराष्ट्र संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर गोवा संघ उपविजेताठरला.*
महाराष्ट्र थाई किक बॉक्सिंग असोसिएशन चे *कार्याध्यक्ष महेंद्र राजे, अक्षय जाधव* यांनी महाराष्ट्राच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
स्पर्धेचे पंचांची जबाबदारी वेलेंटाॅन डेकाॅज आदित्य अडागळे, आदित्य शिरसाठ, अनिल नागर आणि प्रदीप डिसूझा यांनी यशस्वीपणे पार पाडली.
*बक्षीस वितरण समारंभ इंडिया थाई किक बॉक्सिंग फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संतोष म्हात्रे सर* यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.