spot_img
spot_img
spot_img
spot_img

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ १८ ऑगस्ट रोजी मातंग समाजाचा जनआक्रोश मोर्चा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन मातंग समाज कृती समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षणाच्या अ, ब, क, ड उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता मातंग समाजाच्या जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोर्चाची सुरुवात गुरुवर्य लहुजी वस्ताद साळवे पुतळा, चिंचवड स्टेशन येथून होणार असून, मोर्चा चिंचवड स्टेशन ते निगडी तहसील कार्यालय असा मार्गक्रमण करणार आहे.
आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या या जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाच्या मागणीसाठी संविधानिक व लोकशाही मार्गाने समाजाचा आवाज शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये विभागनिहाय बैठका, जनजागृती मोहीम आणि समाजबांधवांशी प्रत्यक्ष संपर्क सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक विभागातून मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी व्हावेत, यासाठी व्यापक नियोजन करण्यात येत आहे.

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ होणाऱ्या या जनआक्रोश मोर्चामध्ये पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील सर्व मातंग समाज बांधवांनी एकजुटीने, शांततामय व शिस्तबद्ध पद्धतीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन मातंग समाज कृती समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
वाल्मिकी,मादीगा व खाटीक समाज ही या मोर्चात सहभागी होणार असून त्यांनीही या मोर्चा ला समर्थन दिले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!