spot_img
spot_img
spot_img
spot_img

दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण; काठीने डोक्यात वार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

दारू पिण्यासाठी उसने पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून तिघांनी एका ४८ वर्षीय व्यक्तीला धक्काबुक्की करून काठीने डोक्यात मारल्याची घटना तळेगाव दाभाडे येथील वीर चक्र चौकातील देशी बारमध्ये घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत अशोक धर्माधिकारी (वय ४८) हे ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास वीर चक्र चौकातील देशी बारमध्ये होते. त्यावेळी मंगेश सांडभोर, किरण आणि संतोष (पूर्ण नाव-पत्ता माहिती नाही) यांनी त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी उसने पैसे मागितले. धर्माधिकारी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने तिघांनी त्यांच्याशी धक्काबुक्की केली.

यावेळी आरोपी मंगेश सांडभोर याने हातातील काठी धर्माधिकारी यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!