शबनम न्यूज | प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांचे चिरंजीव निहाल पानसरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकमान्य होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने काळभोरनगर येथील जनसंपर्क कार्यालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने लाभ घेतला.
शिबिरामध्ये मोफत दंतचिकित्सा, रक्तदाब तपासणी, मधुमेह (साखर) तपासणी तसेच रक्तातील विविध घटकांची तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शनही केले.
यावेळी डॉ. संध्या घाणेकर यांनी दंतचिकित्सा करून योग्य उपचार व सल्ला दिला. तसेच डॉ. प्रतीक्षा रताडिया, डॉ. श्रुती श्रीराम, डॉ. गौरी कुंभार आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी रक्तदाब, साखर व इतर वैद्यकीय तपासण्या केल्या.
शिबिराला नागरिकांचा मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहून डॉक्टरांच्या संपूर्ण टीमने समाधान व्यक्त केले. यापुढे दर सोमवार ते शनिवार सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत होमिओपॅथी ओपीडी नियमित सुरू राहणार असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपचार मोफत, तर इतर नागरिकांना अत्यल्प दरात उपचार उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.
या उपक्रमाचे आयोजन विशाल बाळासाहेब काळभोर (मा. प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र तथा मा. अध्यक्ष, पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्या पुढाकारातून करण्यात आले. नागरिकांनी या आरोग्य उपक्रमाचे स्वागत करत आयोजक आणि वैद्यकीय पथकाचे आभार मानले.



