spot_img
spot_img
spot_img
spot_img

सोसायटीच्या पार्किंगमध्ये आलेल्या ३८ वर्षीय व्यक्तीला मारहाण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मुलाला खाऊ आणण्यासाठी सोसायटीच्या पार्किंगमध्ये आलेल्या ३८ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ आणि दमदाटी करून छत्रीच्या दांड्याने हातावर मारहाण करत जखमी केल्याची घटना चिखलीतील जाधववाडी येथे घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जाधववाडी येथील रिव्हर रेसिडेन्सीच्या पार्किंगमध्ये घडली.

याप्रकरणी शैलेश अनंत क्षीरसागर (वय ३८, रा. रिव्हर रेसिडेन्सी, जाधववाडी, चिखली; मूळ रा. राजगुरुनगर, ता. खेड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मधुकर हावळ (वय ६९) आणि मयुरी शैलेश क्षीरसागर (वय ३५, दोघे रा. आंबेगाव बुद्रुक, ता. हवेली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा अर्णव याने काहीतरी खायला घेऊन देण्यास सांगितले. त्यामुळे फिर्यादी मुलाला सोबत घेऊन पार्किंगमध्ये आले होते. त्यावेळी दोन्ही आरोपी तेथे आले. आरोपींनी मुलाला धरून त्याच्याशी फिर्यादीबाबत बोलत फिर्यादीला शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा आरोप आहे.

यावेळी आरोपी फिर्यादींची जेवणाच्या डब्याची पिशवी घेऊन जात होते. फिर्यादींनी ती पिशवी त्यांच्याकडून ओढून घेतली. याचा राग आल्याने आरोपींनी हातातील छत्रीच्या दांड्याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या तळहातावर आणि दंडावर मारहाण करून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी चिखली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राठोड करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!