spot_img
spot_img
spot_img

महाळुंगेतील बांधकाम साईटवरून १.०५ लाखांच्या अॅल्युमिनियम तारा लंपास; इलेक्ट्रिशियनविरुद्ध गुन्हा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

महाळुंगे येथील व्हीटीपी ग्रुपच्या बांधकाम साईटवरील स्टोअररूममधून सुमारे १ लाख ५ हजार ६०० रुपयांच्या ११० किलो अॅल्युमिनियम तारा चोरी केल्याप्रकरणी साईटवर काम करणाऱ्या एका इलेक्ट्रिशियनविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १२ जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली. आरोपी अतुल शंकर शिंगाडे (वय ३३, रा. तळवडे, पुणे) याने स्टोअररूमचा उघडा दरवाजा साधून फिर्यादींच्या परवानगीशिवाय आर्थिक फायद्याच्या उद्देशाने ११० किलो अॅल्युमिनियम वायर चोरी केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी रविंद्र वाघु तुपे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून भारतीय न्याय संहिता कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बत्तीसे पुढील तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!