spot_img
spot_img
spot_img

सायबर फसवणुकीसाठी बँक खाते वापरल्याचा आरोप; ११ लाखांच्या व्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

सायबर फसवणुकीत वापरण्यासाठी बँक खाते उपलब्ध करून देत तीन तक्रारदारांची तब्बल ११ लाख रुपयांची रक्कम व्यवहारातून काढल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यूको बँकेच्या खाते क्रमांक १९७००२१०००५२३१ ची खातेदार पेन्नी हेन्री पॉवेल हिने साथीदारांशी संगनमत करून हे खाते सायबर फसवणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यास दिल्याचा आरोप आहे. तपासात या खात्यात तीन वेगवेगळ्या तक्रारींतील रक्कम जमा झाल्यानंतर ११ लाख रुपये धनादेशाद्वारे काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३१७(२), ३(५) तसेच फसवणुकीसंदर्भातील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील पुढील तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!