spot_img
spot_img
spot_img

दारुबंदी पथकाची कारवाई; ३१ लिटर हातभट्टीची दारू जप्त, महिला अटकेत

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

गुन्हे शाखेच्या दारुबंदी पथकाने येलवाडी (ता. खेड) येथे कारवाई करत ३१ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली असून एका महिलेला अटक केली आहे. या कारवाईत दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली होंडा अॅक्टिव्हाही जप्त करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुं### शंकर राठोड (वय २०) हिच्याकडे ३,१०० रुपये किमतीची ३१ लिटर हातभट्टीची दारू आणि सुमारे ६० हजार रुपये किमतीची होंडा अॅक्टिव्हा (MH-14-MJ-7443) आढळून आली. शासनाने प्रतिबंधित केलेली दारू विनापरवाना आर्थिक फायद्यासाठी वाहतूक केल्याचा तिच्यावर आरोप आहे. तपासात ही दारू गणेश राठोड याने पुरविल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिला अटकेत आहे. पुढील तपास दारुबंदी पथक करत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!