पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब
चिंचवड परिसरातील एका बेकरीमध्ये १३ वर्षीय मुलाकडून काम करून घेत त्याला पगार न देता शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिपीन गोविंद यादव (वय १३ वर्षे १० महिने) या अल्पवयीन मुलाला डेली फ्रेश बेकरीमध्ये कामावर ठेवण्यात आले होते. आरोपी समशेर जाकीर अन्सारी (वय ४०, रा. चिंचवडे नगर, चिंचवड) याने मुलाकडून त्याच्या इच्छेविरुद्ध जास्त काम करून घेतले, पगार दिला नाही तसेच शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


