spot_img
spot_img
spot_img

रावेतमध्ये मोबाईल चोरीचा उलगडा; बिहारमधील आरोपी अटकेत

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

रावेत परिसरातील उदय हिल्स सोसायटीसमोर ठेवलेला मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीला रावेत पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ५ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या दरम्यान उदय हिल्स सोसायटीसमोरील लाईटच्या खांबाजवळील भिंतीवर ठेवलेला विवो कंपनीचा १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने लबाडीच्या हेतूने चोरून नेला.

याप्रकरणी विक्रम दत्तू बंगवाड (वय ३४, रा. स्पाईन रोड, भोसरी) यांनी रावेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन बेचन कुमार पलट कुमार मंडल (वय २४) याला अटक केली. आरोपी सध्या सुसगाव येथील पारखे वस्तीमध्ये राहत असून त्याचे मूळ गाव दरभंगा, बिहार येथे आहे.

या प्रकरणी रावेत पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक २४७/२०२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मोबाईल किंवा मौल्यवान वस्तू निष्काळजीपणे ठेवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!