पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लागू असलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करत कारमध्ये कोयता बाळगून फिरणाऱ्या दोघांना काळेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रहाटणी येथील बंटी चहा दुकानासमोर सोमवारी (दि. १३ जुलै) सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता ही कारवाई करण्यात आली. संशयितांच्या काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये लोखंडी कोयता आढळून आला.
या प्रकरणी आदित्य बाबासाहेब शेंडगे (वय २२, रा. पिंपळे सौदागर) आणि आनंद गोविंद कांबळे (वय २८, रा. नखातेवस्ती, रहाटणी) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तांनी लागू केलेल्या मनाई आदेशानुसार शस्त्रे किंवा इजा पोहोचविणारी साधने बाळगण्यास बंदी असताना आरोपींकडे कोयता आढळल्याने त्यांच्याविरुद्ध भारताचा शस्त्र अधिनियम १९५९ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



