spot_img
spot_img
spot_img

ऐश्वर्यम सोसायटीतून मिनी बस चोरी; दोन लाखांच्या वाहनावर चोरट्याचा डल्ला

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

तळेगाव दाभाडे येथील झव्हेरी कॉलनी परिसरातील ऐश्वर्यम सोसायटीमधून अज्ञात चोरट्याने पार्किंगमध्ये उभी असलेली मिनी बस चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्ताक रज्जाक शेख (वय ५०) यांनी आपली फोर्स मोटर्स कंपनीची मिनी बस (एमएच १२ एफझेड ८०८४) सोसायटीच्या परिसरात लॉक करून उभी केली होती. ८ जुलै रोजी पहाटे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने सुमारे दोन लाख रुपये किमतीचे हे वाहन चोरून नेले.

घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!