spot_img
spot_img
spot_img

कचरा डेपो दुर्घटनेची चौकशी करा – खा. श्रीरंग बारणे

शबनम न्यूज | प्रतिनिधी
मोशीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्या शेजारी प्रशासकीय इमारतीला परवानगी कशी देण्यात आली आहे. अशा ठिकाणी इमारत बांधणे चुकीचे आहे. परवनागी देताना नियमांचे पालन केले आहे का, या प्रकरणाची सखोल चौकशी करुन ठेकेदार, दोषी असलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशीतील कचरा डेपोतील कचर्‍याचा डोंगर ’वेस्ट टू एनर्जी प्रकल्पा’च्या तीन मजली इमारतीवर पडल्याने इमारत कोसळली. एका महिलेसह १८ कामगार इमारतीखाली अडकले होते. त्यापैकी नऊ जणांना बाहेर काढले असून एकाचा मृत्यू झाला आहे. सात जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. खासदार बारणे यांनी मोशीला जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. बचाव कार्याची माहिती घेतली. शिवसेनेचे गटनेते विश्वजीत बारणे, ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे, नगरसेवक नीलेश तरस, बापू कातळे यावेळी उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील संपूर्ण कचरा एकत्रित करुन मोशी डेपोत अनेक वर्षांपासून टाकला जातो. तिथे डोंगर तयार झाला आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प होण्यापूर्वीचे हे डोंगर आहेत. कचरा संकलन, प्रक्रिया यावर महापालिका करोडे रुपये खर्च करत आहे. डोंगर तयार झाल्यानंतर वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारण्यात आला आहे. नियमानुसार ही इमारत बांधली आहे का, याची चौकशी करावी. कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या शेजारी प्रशासकीय इमारतीला परवानगी कशी देण्यात आली आहे. अशा ठिकाणी इमारत बांधणे चुकीचे आहे. परवनागी देताना नियमांचे पालन केले आहे का, याची चौकशी करावी. कचऱ्याच्या डोंगराच्या शेजारी इमारत बांधताना सुरक्षिततेच्या कोणतीही काळजी घेतली नाही. कचऱ्याच्या डोंगराच्या शेजारी कार्यालय उभारणे चुकीचे आहे. कोणी ही इमारत उभारली आहे. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!