पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
काळेवाडी परिसरात भरधाव स्कुटीने पादचाऱ्याला जोरदार धडक देऊन चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीच्या मांडीच्या हाडाला फ्रॅक्चर झाले असून काळेवाडी पोलिसांनी अज्ञात स्कुटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत राजू शिंगारे (वय ३२, रा. विजयनगर, काळेवाडी) हे ७ जुलै रोजी रात्री प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील रस्त्याच्या कडेला पायी चालत होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका अज्ञात स्कुटी चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर चालकाने जखमी अवस्थेतील शिंगारे यांना मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले.
या अपघातात शिंगारे यांच्या उजव्या मांडीच्या हाडाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले आहे. प्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.


