spot_img
spot_img
spot_img
spot_img

कोविड काळात सुरू केलेला ‘डॅशबोर्ड’ पुन्हा सुरू करण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना दिलेल्या सवलतीच्या बदल्यात १५ टक्के खाटा राखीव ठेवण्याच्या अटींचे पालन होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात विधानपरिषद सदस्य ऍड. अनिल परब यांनी प्रश्न क्र. ९०५८ अंतर्गत, बृहन्मुंबई मधील ग्लोबल रुग्णालयाकडून या अटींचे पालन होत नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत सहभागी होत शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रुग्णांना खाटांची तत्काळ माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी कोविड काळात सुरू केलेला डिजिटल डॅशबोर्ड पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, कोविड काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या डॅशबोर्डमुळे कोणत्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत, याची माहिती नागरिकांना आणि प्रशासनाला एका क्लिकवर मिळत होती. त्याच धर्तीवर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वय साधून नव्याने डॅशबोर्ड विकसित करावा. महानगरपालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र असे दोन डॅशबोर्ड कार्यान्वित केल्यास रुग्णांना तातडीने माहिती मिळेल, तसेच उपलब्ध खाटांचा पारदर्शक हिशोबही ठेवता येईल, असे डॉ. गोऱ्हे यांनी सभागृहात नमूद केले.

या चर्चेला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी, अशा प्रकारचा डॅशबोर्ड विकसित करण्याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या जातील, असे सकारात्मक आश्वासन सभागृहात दिले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!