spot_img
spot_img
spot_img
spot_img

दत्तवाडी-आकुर्डीतील अनेक घरांमध्ये पाणीच-पाणी; नगरसेवक प्रमोद कुटे ‘ऑनफिल्ड’

शबनम न्यूज | प्रतिनिधी

अप्पूघर, कॅम्प एज्युकेशन कॉलेज परिसरातील पावसाचे पाणी आकुर्डी परिसरात आल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.नगरसेवक प्रमोद कुटे भर पावसात अधिकाऱ्यांबरोबर ‘ऑनफिल्ड’ उतरले असून त्यांची टीम नागरिकांना मदत करीत आहेत.पावसाचे पाणी शिरलेल्या नागरीकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर केले जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात शनिवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. रविवारी पावसाचा जोर वाढला. मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे.शहराच्या सर्वच भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अप्पूघर,कॅम्प एज्युकेशन कॉलेज परिसरातील पावसाचे पाणी आकुर्डी भागात आले आहे. पाण्याचा लोढा वाढल्याने आकुर्डीतील दत्तवाडी,क्रांतीनगर, साई मंदिर परिसर,अडसूळ गल्ली,रुपेश कॉलनी,दत्तवाडी, जैन मंदिर परिसरात पाणी साचले आहे.
नगरसेवक प्रमोद कुटे,अ क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे हे आकुर्डी परिसरातील परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत.पाणी शिरलेल्या नागरिकांना घरातून सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे. नगरसेवक प्रमोद कुटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते नागरिकांच्या मदतीला धावून जात आहेत.आपत्तीत नागरिकांना दिलासा देण्यात येत आहे.
‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे.आकुर्डी परिसरातील नागरिकांनी काही अडचण असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन नगरसेवक प्रमोद कुटे यांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!