spot_img
spot_img
spot_img
spot_img

गोखलेनगरमध्ये इलेक्ट्रिक डीपीला आग; मोठा अनर्थ टळला

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुण्यातील गोखलेनगर परिसरात शुक्रवारी सकाळी इलेक्ट्रिक डीपीला अचानक आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आग लागलेल्या डीपीच्या शेजारी अनेक दुचाकी वाहने पार्क करण्यात आली होती. मात्र, वेळेत वाहने बाजूला करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!