spot_img
spot_img
spot_img

एसएनडीटी महिला विद्यापीठात ५ जुलै रोजी ‘इनोव्हेशन महाकुंभ’; महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचे होणार अनावरण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पुणे कॅम्पसमध्ये ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ‘इनोव्हेशन महाकुंभ’, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, प्र-कुलगुरू प्रा. रुबी ओझा आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्त्रीशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि समाजसुधारणेसाठी आयुष्य वाहिलेल्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच ‘इनोव्हेशन महाकुंभ’ अंतर्गत विद्यार्थिनींच्या संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकता विषयक प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रातील तज्ज्ञ, विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, प्राध्यापक, विद्यार्थिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास शिक्षणप्रेमी, माजी विद्यार्थिनी, संशोधक आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!