पिंपरी | प्रतिनिधी
सध्या पावसाळ्या चे दिवस आहे , पिंपरी चिंचवड शहरात मागील चार दिवसा पासून पाऊस सुरु आहे प्रभाग क्रमांक 23 मधील थेरगाव परिसरातील डांबरी रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याने पावसाचे पाणी रस्त्यांच्या खड्यात साचत असून वाहन चालक व नागरिक यांना त्या रस्त्याचा अंदाज येत नाही, त्या मुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ग प्रभाग स्थापत्य विभागाकडे लेखी निवेदन देऊन तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे कि , रस्ता खचल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अपघाताचा धोका वाढला असून परिसरातील नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांनी प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर दुरुस्तीची कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


