spot_img
spot_img
spot_img
spot_img

आळंदीत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक; ३३७ ग्रॅम गांजा आणि दुचाकी जप्त

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

आळंदी परिसरात अंमली पदार्थविरोधी कारवाई करत पोलिसांनी गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून गांजा आणि दुचाकीसह एकूण ७६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी नगरपरिषदेच्या पार्किंग परिसरात, दशक्रिया विधी मंडपाजवळ संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-३ ला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून विनयदीप गंगाधर मानवते (वय २९) आणि इस्माईल मकबूल पठाण (वय २५) यांना ताब्यात घेण्यात आले.

झडतीदरम्यान आरोपींकडे १६ हजार ८५० रुपये किमतीचा ३३७ ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच ६० हजार रुपये किमतीची सुझुकी अॅक्सेस दुचाकी जप्त करण्यात आली. एकूण ७६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!