spot_img
spot_img
spot_img

गोनवडीत हातभट्टी दारू विक्रीवर छापा; १७ लिटर दारूसह एकाला अटक

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

खेड तालुक्यातील गोनवडी गावात हातभट्टी दारूची अवैध विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. जीवन मारुती राजपूत (वय 48, रा. गोनवडी, ता. खेड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास गोनवडी गाव हद्दीतील नदीकाठावरील स्मशानभूमीजवळील मोकळ्या जागेत छापा टाकण्यात आला. या कारवाईत आरोपीकडे विक्रीसाठी ठेवलेली सुमारे 17 लिटर हातभट्टी दारू आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत सुमारे 1 हजार 700 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हातभट्टी दारूची बेकायदेशीर विक्री व साठवणूक केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!