पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक धर्मपाल यशवंतराव तंतपाळे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि. ५ जुलै) विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन शिंदे पेट्रोल पंपासमोरील लष्का फार्म (पद्मावती गार्डन), किवळे येथे करण्यात आले आहे.
वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देत दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, डॉक्टर, सीए आणि वकिलांचा गौरव, गरजू महिलांना आर्थिक मदत, तसेच सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट व छत्री वाटप, घरगुती वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला आमदार शंकर जगताप, आमदार महेश दादा लांडगे, विधान परिषदेचे आमदारअमित गोरखे, उमाताई खापरे, महापौर रवी लांडगे, अल्पसंख्यांक माजी अध्यक्ष हाजी अराफत, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, महानगरपालिका आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
समाजहिताच्या उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


