spot_img
spot_img
spot_img

गोल्ड ट्रेडिंगच्या आमिषाने 20.72 लाखांची ऑनलाइन फसवणूक; देहूरोड पोलिसांत गुन्हा

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

गोल्ड ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची तब्बल 20 लाख 72 हजार 8 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम व भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनन्या बंसल (रा. चंदीगड) हिने फिर्यादीला samcco.com या ट्रेडिंग अॅपद्वारे गोल्ड ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडून विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने 20.72 लाख रुपये जमा करून घेतले. मात्र, गुंतवणुकीची रक्कम किंवा नफा परत न देता आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

हा प्रकार 2 ऑक्टोबर ते 6 डिसेंबर 2025 या कालावधीत किवळे येथील पर्वतारा सोसायटी परिसरात घडला. याप्रकरणी 24 जून 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अद्याप फरार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) जानकर करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!