शबनम न्यूज | प्रतिनिधी
आरटीओ कर्मचाऱ्यांच्या संप तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेलच्या वतीने परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिले या निवेदनात असे म्हटले आहे की, मोटर वाहन विभाग आरटीओ कर्मचारी संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने 16 जून पासून राज्यभर सुरू असलेल्या बेमुदत संपामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच प्रलंबित कामावर त्यांचा परिणाम होत आहे, हा संप तातडीने मागे घेऊन आरटीओ कार्यालयाचे कामकाज पुरवत सुरू करावे व तसेच आरटीओ कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य असतील तर त्यावर शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. तसेच या संपाशी कोणताही संबंध नसल्याने वाहनधारकांना आणि प्रवासी नागरिकांना विनाकारण वेठीस धरणे योग्य नाही.
अनेक कामे ठप्प झाल्याने वाहनधारकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने त्वरित हस्तक्षेप करून संप मागे घेण्यासाठी आवश्यक ते पावले उचलून आरटीओ कार्यालयाचे कामकाज सुरळीत करावे.
कामकाज ठप्प असल्याने परिणामी आरटीओ विभागातून शासनाला मिळणाऱ्या महसूलला ब्रेक लागला आहे. तसेच या संपामुळे महत्त्वपूर्ण सेवा विस्कळीत झाल्या आहेत, सामान्य वाहनधारक आणि परिवहन व्यवसायिक प्रचंड अडचणीत सापडले आहेत. आरटीओ कार्यालयांमध्ये वाहन नोंदणी व हस्तांतरण, ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण, परमिट नूतनीकरण तसेच वाहनकर भरणा व खटला विभागाचे कामकाज सुरळीत करून वाहनधारकांना सहकार्य करावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक विभाग पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष विनोद वरखडे यांनी दिली आहे.
सदर पत्र प्रत माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे मार्फत मा. परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य.. मा. परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य, यांना दिली आहे.
सदर निवेदन देताना वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप औटी , सामाजिक कार्यकर्ते आप्पा साहेब दौंडे, अनिल शेठ ढोरे पाटील अदी पदाधिकारी उपस्थित होते.


