पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
चाकण परिसरातील वाकी बुद्रुक येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांवर दारूबंदी पथकाने कारवाई करत दारूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन महिलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारूबंदी पथकाच्या पथकाने 19 जून रोजी दुपारी संतोष नगर, वाकी बुद्रुक येथे छापा टाकला. कारवाईदरम्यान आरोपी अxxx रजपूत (वय 24) ही विनापरवाना व आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे 7 हजार 80 रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू जप्त केली. या प्रकरणात प्रिxxx प्रद्युम्न रजपूत आणि प्रद्युम्न विठ्ठल रजपूत यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
याप्रकरणी उत्तर चाकण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


