spot_img
spot_img
spot_img

सावरदरी येथे 36 ग्रॅम गांजासह एक जण ताब्यात; उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत एका आरोपीस गांजासह ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8 (क), 20 (ब) (ii) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 16 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 8.30 वाजण्याच्या सुमारास सावरदरी गाव (ता. खेड, जि. पुणे) येथील सोमनाथ तरस यांच्या बंगल्या समोरील आदर्श कुमार किराणा दुकानात ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणातील आरोपी मन्नुगणेश राय (वय 39), रा. सावरदी गाव, ता. खेड, जि. पुणे (मूळ रा. बासुदेवपुर, पोस्ट कोरया हेबदपुर, जि. बेगुसराय, बिहार) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपीकडून 36 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. जप्त गांजाची किंमत 1,800 रुपये असून त्याच्याकडून 100 रुपयांच्या 27 नोटांसह 2,700 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. एकूण 4,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

याप्रकरणी पोलीस शिपाई मंगेश राजेंद्र घोलप यांनी फिर्याद दिली असून दि. 17 जून 2026 रोजी पहाटे 12.06 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक परदेशी करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!