spot_img
spot_img
spot_img

तडीपार आरोपीकडून तलवार जप्त; एमआयडीसी भोसरी पोलिसांची कारवाई

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : युनूस खतीब

तडीपार आदेशाचे उल्लंघन करून तलवार बाळगणाऱ्या एका युवकाविरुद्ध एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 321/2026 अंतर्गत भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 142, 37(1)(3) सह 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जून 2026 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पीसीएनडीटीए सर्कलकडून आराईज इंटरनॅशनल स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यालगत, कृष्णा हेरिटेज सोसायटी गेटजवळील टपरी परिसरात सेक्टर क्रमांक 2, इंद्रायणीनगर, भोसरी येथे बालाजी नंदू शिंदे (वय 20, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) हा एक लोखंडी तलवार बाळगून फिरत असल्याचे आढळून आले.

तपासादरम्यान आरोपीवर यापूर्वी पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार आदेश लागू असल्याचे निष्पन्न झाले. तसेच 10 जून ते 23 जून 2026 या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रात घातक शस्त्रे, अग्निशस्त्रे, लाठी-काठ्या बाळगण्यास मनाई आदेश लागू असतानाही आरोपीने त्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई नितीन आप्पा खेसे (बकल नं. 2124) यांनी फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस हवालदार सेलुकर करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!